Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उडत्या बसची वाट पाहिली म्हणून वेळ झाला जयंत पाटील यांचा नितीन गडकरी यांना टोला

पुणे : आज पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपती ची राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दर्शन घेऊन आरती केली. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेत्या व राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्यातील वाहतुकीची समस्या हा कायमच चर्चेचा विषय. या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुणेकरांसमोर एक भन्नाट आयडिया मांडली. गडकरींची आयडिया अशी आहे की.पुण्यात उड्या बसची योजना आणली.तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास फायदा होईल. त्यावर गणपतीच दर्शन करण्यासाठी दुपारपासून जात आहे.रस्त्यावर प्रचंड गर्दी आहे.उडत्या बसची वाट बघितली. त्यामुळे वेळ झाला. अजून उडती बस नाही. हे लक्षात आलं म्हणून मग चालतच सगळे गणपती फिरत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांना पत्रकारांशी बोलताना लगावला.

सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी व भाजपला हरवावे असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले,मला वाटत देशातले सर्व पक्ष या निष्कर्षवर आले आहेत. की हा देश हुकूमशाही प्रवृत्तीच्या हाती जात आहे.सगळया व्यवस्था झाकोळल्या आहेत. त्यामुळे देशातील सर्व पक्ष एकत्रित यायला सुरूवात झाली आहे. असे जयंत पाटील म्हणाले.
दसरा मेळावा शिंदे गट का शिवसेना करणार याचा वास सुरू त्यावर जयंत पाटील म्हणाले.दसरा मेळावा हा शिवसेनेचाच,बाळासाहेब ठाकरे ठाकरे जिकडे तिकडे दसरा मेळावा,बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा सुरू केला आहे.त्याचा दसरा मेळावा हाच खरा दसरा मेळावा,चिन्ह इकडे तिकडे जाईल पण दसरा मेळावा त्याचाच आहे. असे जयंत पाटील म्हणाले. अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक, अमोल मिटकरी यांचा एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा दावा अकोला जिल्हाध्यक्षांनी केला आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले,पेल्यातील वादळ आहे.त्यावर पडदा पडेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समन्वक आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण व विश्वजीत कदमकाँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आहे त्यावर जयंत पाटील म्हणाले,सत्ता जिकडे असते तिकडे नाव जोडली जातील .त्यात अशोक चव्हाण,विश्वजित कदम कुठेही जाणार नाही.भाजप 30 टक्के काँग्रेसीकरणं झालं आहे.उरलेल गेले की भाजपची लवकरच काँग्रेस होईल. अशी टीका जयंत पाटील यांनी भाजप वर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading