fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे सन्मान

पुणे : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दुपारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, मराठा साम्राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांचा हा महत्वपूर्ण उत्सव आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे भव्य आणि सुंदर स्थान आहे. पंतप्रधानांच्या विचारधारेने भारत विश्वगुरू ही कल्पना पुढे घेऊन आम्ही जाऊ.

फोटो ओळ – केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शुक्रवारी दुपारी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading