Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार -केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं


पुणे: चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे.
याच वाहतूक कोंडीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडकले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील याची दखल घेतली आहे. आज पुणे दौऱ्यावर असलेल्या मंत्री गडकरींनी चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार असल्याचे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. गडकरींनी पुण्यातील वाहतूकचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते.
याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू आहे. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येतील असंही ते म्हणाले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू आहे. असं गडकरी म्हणाले आहेत.

नाशिक फाटा येथेसुद्धा दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली रस्ता करण्यासाठी विचार चालू असल्याचं गडकरी म्हणाले. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी असं ते म्हणाले आहेत. पुणे विभागात NHAIच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी मनपाने जागा दिली तर दोन लाख कोटी रूपये खर्च करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नितीन गडकरी म्हणाले,पुण्यात इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे, असं देखील ते म्हणाले. नॅशनल हायवे बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचं देखील त्यांनी संगितलं.

चाकण एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading