Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

टाटा ब्लूस्कोप स्टीलतर्फे कस्टमर एगेंजमेंट इनिशिएटिव्ह मिलाप ची घोषणा

पुणे : स्टील बिल्डिंग आणि बांधकाम उद्योगातील अग्रणीय ईपीसी कंपनी (इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनी) टाटा ब्लूस्कोप स्टीलतर्फे मिलाप या व्यसपीठाची घोषणा करण्यात आली आहे आपल्या प्रमुख ग्राहकांशी संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने, तसेच संपर्क आणि सहयोग वाढविण्यासाठी टाटा ब्लूस्कोप स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक अनूप कुमार त्रिवेदी यांनी मिलाप ची घोषणा केली. २०२२ च्या सुरुवातीला एकमेकांशी सहकार्याच्या माध्यमातून ‘ग्राहककेंद्रित व्यवसाय व्यवस्था’ निर्माण करण्याची कल्पना मांडण्यात आली होती . त्यातूनच मिलापची निर्मिती झाली

पुण्यातील पहिल्या ‘मिलाप’ सत्राला टाटा ब्लूस्कोप स्टीलच्या सर्वोच्च पदाधिकाऱ्यांसोबतच बांधकाम क्षेत्रातील नामवंत कंपनीनीभाग घेतला. ग्राहक संपर्काचे महत्त्व ओळखणे, तसेच स्टील रूफिंग आणि वॉल क्लेडिंगचा वापर करून ग्राहकांना सर्वोत्तम व टिकाऊ बांधकाम साहित्य कसे उपलब्ध करून देता येईल यावर या व्यासपीठावर चर्चा करण्यात आली. हे करताना पर्यावरणाचा विचार करण्याची गरजदेखील अधोरेखित करण्यात आली.

लायसाग्ट (LYSAGHT®) ही टाटा ब्लूस्कोप स्टीलची स्टील रूफिंग आणि वॉल क्लेडिंग उत्पादन शाखा असून, ह्या उत्पादनांचा बांधकाम क्षेत्रातील वापराच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ती विविध ग्राहकांच्या उपयोगांची गरज पूर्ण करते. मोठ्या औद्योगिक आणि व्यावसायिक इमारती, उत्पादन कारखाने, गोदामांपासून ते मेट्रो स्टेशन, विमानतळ आणि स्टेडियम यांसारख्या पायाभूत प्रकल्पांपर्यंत लायसाग्ट कंस्ट्रक्शन छत आणि भिंत क्लेडिंग गरजांसाठी एकासंध दृष्टिकोन उपलब्ध करून देते.

टाटा ब्लूस्कोप स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक अनूप कुमार त्रिवेदी म्हणाले की, विकासासाठी भागीदारी करणे, तसेच उत्पादने व उपायांचा विस्तार आणि उपलब्धता वाढवणे, बाजारपेठेत सर्वोत्कृष्ट दर्जाच्या बांधकाम पद्धतींचा स्वीकार करणे आणि एकूणच आपल्या कार्याचे क्षितिज रुंदावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”

लायसाग्ट बिझिनेसचे जीएम  पीयूष नहार म्हणाले की बांधकामाचे क्षेत्र सतत विकसित होत आहे व त्याच्याशी वेगाने जुळवून घेणे, ही काळाची गरज बनली आहे. मिलापसारखे व्यासपीठ हे, उत्पादक ते ग्राहक ह्या संपूर्ण शृंखलेकरीता उपयुक्त असून, ह्याचा फायदा सरतेशेवटी ग्राहकाला होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading