उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे स्वागत व सन्मान
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत सन्मान करण्यात आला.
