fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अशोक चव्हाण व माझी कोणतीही भेट झाली नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : काल संध्याकाळी वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावरआमची अशी कोणतीही भेट झाली नाही. ते आणी मी एकाच ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला पोहोचलो होतो मात्र आमची भेट झाली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका .असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.

पीएमपीएल १५० इलेक्ट्रीक इ मोबिलीटीच्या बसेस आणि चार्जींग स्टेशनचं उद्घाटन आज केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हर्च्युअली या उद्घाटनाला उपस्थित होते, पुणे हे पहिलं शहर झालं पाहिजे जेथे शंभर टक्के अपारंपारिक स्त्रोतांतून मोबिलीटी करता आली पाहिजे. ६५० बसेस झाल्यानंतर पुणे देशामध्ये आग्रणी होणार आहे, असे देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
शहराचा विचार केला तर पुणे महानगरपालिका ही राज्यातीलच नाही तर देशातील विस्ताराने सर्वांत मोठी महानगरपालिका आहे. या महापालिकेच्या आकाराचा आणि लोकसंख्येचा विचार करता दोन भाग व्हायला हवेत असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल एका कार्यक्रमात वक्तव्यकेलं होतं.
पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद आत्ता कशाला काढताय? जेव्हा करायचे आहे तेव्हा बघू, राज्य सरकारकडे अजूनतरी असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. असे प्रस्ताव भविष्यात येऊ शकतात पण अजून आले नाहीत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई महापालिकेसंदर्भातही असा कुठलाच प्रस्ताव आला नाही. त्यामुळे तुम्ही असे वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचे आहे.” असं फडणवीस बोलताना म्हणाले.  पुण्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार.असे बोलले जात होते. मात्र, याबाबत आज त्यांनीच स्पष्टीकरणं दिलं असून मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही.असे जाहीर केले आहे. तसेच  माध्यमप्रतिनिधींना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का? का मला पुण्यातूव लोकसभा लढवण्याबाबत बोलता. असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading