Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडविण्यापासून कोणीच अडविले नव्हते -चंद्रकांत पाटील

पुणे: विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत पुुण्याचे प्रश्न न मांडल्याप्रकरणी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती.तसेच पुण्याचे प्रश्न न मांडले गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत पुण्याला कुणीच वाली राहिला नाही. असा टोला त्यांनी पुुण्याच्या भाजप नेत्यांना लावला आहे.
यावर भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडविण्यापासून कोणीच अडविले नव्हते. असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील आज पुण्यात गणेश चतुर्थी निमित्त पुण्यातील मानाचा गणपती मंडळांना भेट देत आहेत. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत: चे अधिकार जास्त वापरतात. ते त्यांनी पुण्याच्या कामासाठी वापरायला अडचण नव्हती. खरे तर सभापतींनी सर्वांचे एकायचे असते. परंतु सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात.असे देखील पाटील म्हणाले.
यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. यावेळी त्यांनी काय केले. त्यांनी पुण्यासाठी काय केले. याची यादी द्यावी.असे पाटील म्हणाले.
राज्यात जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत.त्यावर देखील . चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे त्याचा विचार करीत आहेत. पालकमंत्री नसल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्री नेमण्यात येणार आहे.
धुळ्यात बैलपोळ्याला मिरवणूक काढली म्हणून दलित कुटुंबाला मारहाण करत बहिष्काराची घटना घडली. यानंतर राज्यात इतर ठिकाणीही अशाच काही घटना घडताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार, दोषींवर काय कारवाई करणार असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना विचारला.यावर चंद्रकांत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल. असं आश्वासन दिलं.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी या घटनांची माहिती घेईन. या प्रत्येक घटनेचा सह्रदयतेने, संवेदनशीलतेने दखल घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे.आम्ही गावोगावच्या अशा घटनांवर लक्ष ठेऊन आहोत. त्या घटनांमध्ये काय घडलंय हे पाहून कारवाई केली जाईल.असं आश्वासनही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading