Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Ganeshotsav 2022 – मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती ची प्रतिष्ठापना

पुणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणारा उत्सव असतो. त्यातही मानाचे पाच गणपती हे विशेष महत्वाचे असतात. 

मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टच्या  श्रींची प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक सकाळी 11.35 वाजता गणपती चौक लक्ष्मी रोड येथून सुरुवात होऊन गणपती चौक नगरकर तालीम चौक अप्पा बळवंत चौक ,बुधवार चौक ,समाधान चौक ते गणपती चौक उत्सव मंडपात 2.47 मिनिटांनी आली श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना मा.पुनित बालन व सौ.जान्हवी धारीवाल बालन यांच्या शुभहस्ते 3.41 मिनिटांनी संपन्न झाली.  मिरवणूकीत  मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेट दिली. 
मंडळाचे अध्यक्ष मा.विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम कोषाध्यक्ष नितीन पंडित व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तुळशीबाग परिसरातील व्यापारी उपस्थित होते ..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading