Ganeshotsav 2022 – मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
पुणे : कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. पुण्याचा गणेशेत्सव हा जगभरात गाजणारा उत्सव असतो. त्यातही मानाचे पाच गणपती हे विशेष महत्वाचे असतात. मानाचा आज सकाळपासून केसरी वाडा व ग्राम दैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर आता मानाच्या दुसऱ्या ग्रामदेवता च्या तांबडी जोगेश्वरी ची प्राण प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर मानाच्या तिसऱ्या गुरुजी आणि मित्र मंडळाची प्राणप्रतिष्ठापना झाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाऊ रंगारी मित्र मंडळाचे अध्यक्ष व उद्योजक पुनित बालन यांच्या हस्ते स्थापना पार पडली. गणपतीची मिरवणूक रथातून काढण्यात आली. या मिरवणुकीला नाद ब्रह्म यांनी वादन केले. गणपती मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली मोठ्या भक्ती भावाने गणेश भक्तांनी या मिरवणूकित तुफान गर्दी केली होती. यंदा या उत्सवाचे 1३६वे वर्ष आहे
