Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

PMP – मार्ग क्र. २९-अ मार्केट यार्ड ते आळंदी विस्तारीत बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून दिनांक २३/०८/२०२२ पासून मार्ग क्रमांक २९-अ मार्केट यार्ड ते आळंदी हा विस्तारीत बस
मार्ग सुरू करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मानसी  देशपांडे यांच्या हस्ते या विस्तारीत मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. मार्ग क्रमांक २९ स्वारगेट ते आळंदी या बसमार्गाचा विस्तार करून सदरचा मार्ग मार्केट यार्ड ते आळंदी असा करण्यात आला आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज देशपांडे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, मार्केट यार्ड डेपो मॅनेजर नारायण भांगे, स्वारगेट डेपो मॅनेजर विकास मते, व वारकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मार्ग क्रमांक २९-अ  मार्केट यार्ड ते आळंदी या बससेवेचा मार्ग  मार्केट यार्ड, स्वारगेट, पुलगेट, पुणे स्टेशन, येरवडा,
डेक्कन कॉलेज, विश्रांतवाडी, कळस, दिघी, मॅग्झीन चौक, चऱ्होली फाटा, आळंदी असा असणार आहे.
सध्या मार्केट यार्ड ते आळंदी या मार्गावर एका बसच्या माध्यमातून दिवसभरात एकूण ८ फेऱ्या होणार आहेत. मार्केट
यार्ड ते आळंदी पहिली बस सकाळी ६.२५ वा. तर शेवटची बस संध्याकाळी ८.३० वा. आहे. तसेच आळंदी ते मार्केट यार्ड
पहिली बस सकाळी ८.०५ वा. तर शेवटची बस रात्री १०.२० वा. आहे. या बससेवेचा नोकरदार, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ
नागरीक, महिला यांनी लाभ घ्यावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading