एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस हॉस्पीटल लवळे या नवीन बस मार्गाचा शुभारंभ
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडुन एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस हॉस्पीटल लवळे (मार्ग क्रमांक – १०६) या
नवीन बस मार्गाचा शुभारंभ लवळे येथे बुधवार दिनांक २४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता सिम्बॉयसिस
युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या शुभहस्ते व पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट
मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालिका डॉ.विद्याताई येरवडेकर, सिम्बॉयसिस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. नटराजन, डॉ. राजीव येरवडेकर, कोंढवे-धावडेचे सरपंच नितीन धावडे, लवळचे सरपंच नितीन गावडे, उपेंद्र खाडीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवासी वर्गाची वाढती मागणीची दखल घेऊन एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस
हॉस्पिटल लवळे (मार्ग क्रमांक – १०६) हा नवीन बसमार्ग सुरू केला असुन सिम्बॉयसिस हॉस्पिटल येथे रूग्णांना मोफत
औषधोपचार करण्यात येत असल्याने रूग्ण,नातेवाईक, सिम्बॉयसिस हॉस्पीटलचे विद्यार्थी व कर्मचारी यांचे करीता एक
चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
सध्या या मार्गावर चार बसेस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील.
दिवसभरात नियोजित बसेसच्या माध्यमातून एकूण ४० फेऱ्या होणार आहेत. एन.डी.ए गेट ते सिम्बॉयसिस हॉस्पीटल लवळे
पहिली बस सकाळी ०५:५५ वा. तर शेवटची बस रात्री ०९:१० वा. आहे. तसेच सिम्बॉयसिस हॉस्पीटल लवळे ते एन.डी.ए
गेट पहिली बस सकाळी ०६:५५ वा. तर शेवटची बस रात्री १०:०० वा. आहे तर प्रत्येक बस मधील वारंवारिता ३० मिनटे
असेल.
– दत्तात्रय झेंडे,चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन).
