fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या रागातून खून; पोलिसांनी लावला 48 तासात छडा

पुणे : पत्नीवर वाईट नजर ठेवून तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लिल बोलल्याच्या रागातून महादेव दुपारगुडे याचा खून केल्याची घटना दहिहांडीच्या दिवशी जांभुळवाडी दरीपूलाच्या जवळ घडली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी पुढील ४८ तासात तपासयंत्रणा कामाला लावत खूनाचा छडा लावला असून तुषार मेटकरी, आशा मेटकरी, विनोद दुपारगुडे आणि किरण चौधरी यांना अटक केली आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत भारती विद्यापीठ चे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरिक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, धिरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, तुळशीराम टेभुर्णे आदीच्या पथकाने केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading