fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRASportsTOP NEWS

 महाराष्ट्र कन्या किरण नावगिरे हीची Indian women T 20 सामन्यासाठी निवड  

केवळ मेहनत व सर्वांच्या पाठबळामुळेच भारतीय संघात स्थान मिळाले : किरण नवगिरे

पुणे : येत्या १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वरिष्ठ महिलांच्या ब्रिटन येथे होणाऱ्या टी-२० दौऱ्यासाठी पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या किरण नावगिरे हीची भारतीय महिला संकिरण नावगिरे हीची घात निवड करण्यात आली आहे. भारतीय संघात स्थान मिळविणारी किरण पहिलीच खेळाडू आहे. यावेळी तिला महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांच्या वतीने गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना किरण नवगीरे म्हणाल्या, विविध स्पर्धांमध्ये खेळताना चांगला अनुभव मिळाला. या स्पर्धांमध्ये खेळताना मी माझा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजीचा सराव करण्याबरोबरच सातत्याने फिटनेसकडे देखील लक्ष दिले. कोणत्याही खेळासाठी प्रावीण्य मिळविण्यासाठी तुम्हाला मेहनत ही करावीच लागते. मेहनत आणि सर्वांचे मिळालेले पाठबळ यांच्या जोरावरच आज पर्यंतचा प्रवास करू शकले. भारतीय संघात खेळण्याची मिळालेली ही संधी माझ्यासाठी खूप महत्वाची व मोठी गोष्ट आहे. आगामी काळात भारतासाठी वर्ल्ड कप खेळण्याची माझी इच्छा आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे सचिव प्रा. इरफान शेख म्हणाले की, गेल्या ४ वर्षांपासून किरण आझम स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करते. ती गुणवान खेळाडू असल्याने तिला सर्वच सुविधा अकादमीच्या माध्यमातून पुरविण्यात येत येतात. मुलींनी देखील खेळाच्या विश्वात आपले नाव कोरण्यासाठी आझम स्पोर्ट्स अकादमी गुणवान खेळाडूंच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभी आहे.

आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख म्हणाले, खेळातील जिद्द पाहून किरणची निवड करण्यात आली. किरणसाठी डाएट, फिटनेस यासाठी किरणच्या बरोबरीने आम्ही देखील मेहनत घेत होतो. किरण करत असलेली मेहनतीमुळे तिची आज भारतीय संघात निवड करण्यात आली असल्याचा आनंद होत आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर किरणची आक्रमक फलंदाजी ही भारतीय संघाला फायदेशीर ठरणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे.

आता पर्यंतच्या वाटचालीत आझम स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत. विशेषत मुलीसाठी अनेक चांगले उपक्रम आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने चालविण्यात येतात. या उपक्रमांद्वारे आम्हाला किरण मिळाली. आणि किरणला खेळताना पाहून आज अनेक मुलींचा क्रीडा क्षेत्राकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading