स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकार विरोधात राष्ट्रवादीचे विटी दांडू खेळत अनोखे आंदोलन
पुणे: गोविंदा यांना सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ काही शहरातील महापालिका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे असा आरोप एमपीएससी समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्या विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात विटी दांडू खेळत अनोखे आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, मृणाल वाणी, गणेश मोहिते, अध्यक्ष सीमा सातपुते, मनोज सातपुते, स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशांत जगताप म्हणाले, गोविंदाना सरकारी नोकऱ्यांत पाच टक्के आरक्षण दिले जाईल, ही घोषणा आणि राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय एकदम चुकीचा आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निर्णयामुळे नुकसान होणार आहे. शिंदे व फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयला ब्रेक लावला आहे . स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी हे 24 तास अभ्यास करत असतात. जर त्यांना सरकारी नोकऱ्यात पाच टक्के आरक्षण दिले नाही तर त्यांनी आयुष्यभर विटी दांडू खेळत बसायचे का. अंक मोजल्यानंतर पहिला खेळाडू डोळे उघडून लपलेल्या खेळाडूंना शोधतो असा हा खेळ. तर लंगडी हा खेळ युवती व महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
एका ठरवून दिलेल्या विशिष्ट मैदानात ६ ते ७ खेळाडू या खेळात सहभागी होतात. यातील एक खेळाडू आपल्या एका पायावर तोल सावरत दुसरा पाय मागे उचलून इतर पळणार्या खेळाडूंचा पाठलाग करत त्याला स्पर्श करून बाद करतो. हे दोन्ही खेळ भारतात खेळले जात असून अतिशय लोकप्रिय व साहसपूर्ण आहेत तेव्हा या दोन्ही खेळांचा देखील खेळांच्या आरक्षणामध्ये समावेश करावा . विटी दांडू, मंगळागौर सोबत लपाछपी आणि लंगडी या खेळांचाही समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी ने या आंदोलनातून केली आहे.
