fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे महापालिका प्रभाग रचना बदलण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती 

पुणे : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने महानगर पुण्याच्या प्रभाग रचना प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधीच्या सरकारचा 3 चा प्रभाग नव्या सरकारने रद्दबादल ठरवत पुण्यात 2017 प्रमाणे प्रभाग रचना ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. पुण्यातील प्रभाग रचनेच्या बदलाविरोधात राष्ट्रवादी शहर काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात केली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने प्रभाग रचना बदलाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका मिळालाय.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, आजच्या आदेशाबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीवर विश्वास वाढवण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी आजच पाऊल उचललेल आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला दिलेली ही चपराक आहे. चारची नवीन प्रभाग पद्धती जी आता आलेल्या ‘एडी’ सरकारने केली होती त्याला स्थगिती देण्याचं काम माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेल आहे. त्याचबरोबर पुढील सुनावणी होईपर्यंत कुठल्याही निवडणुका घोषित न करण्याचे आदेश देखील सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading