सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा
पुणे : सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी दहीहंडीसाठी पुढाकार घेतला. सहावीतील विद्यार्थी ध्रुव पाटील याने हंडी फोडत आनंदोत्सव साजरा केला. इतर वर्गातील मुलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. दहीहंडी फोडल्यानंतर सर्व उपस्थितांनी काल्याचा आनंद लुटला. गाण्यांच्या तालावर थिरकत विद्यार्थ्यांनी नृत्याचाही आनं द घेतला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या शीला ओक यांच्या उपस्थितीत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या समूहाचे अभिनंदन करत प्रोत्साहन दिले.
दहीहंडी फोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना थर रचणे, सांघिक समन्वय, काळजी घेण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मुलांनी थरावर थर लावत हंडी फोडण्याचे प्रयत्न केले. अनेकदा अपयश आले तरी पुन्हा नव्या उत्साहाने प्रयत्न करत हंडी फोडली. मोठा गलका आणि घोषणा करत हंडी फोडल्याचा आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांना यानंतर खाऊ वाटप करण्यात आले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “मूल्याधारित शिक्षणात संस्काराला विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूर्वापार चालू झालेल्या उत्कृष्ट परंपरांना सूर्यदत्तमध्ये महत्व देण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यामधून विद्यार्थ्यांना सांघिक कामाचे महत्व, धैर्य, संकटावर मात करण्याची वृत्ती आत्मसात करता आले.
