Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून पदवी, पदविका शिक्षण घेता येणार

पुणे : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या माध्यमातून बीए आणि पीएचडी करता येणे आता शक्य होणार आहेअखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालया या संदर्भात करार झाला असून मध्यमा प्रथम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयातील करारासंदर्भात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर आणि उपाध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतीय शास्त्रीय संगतीचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच सांगितिक क्षेत्रातील प्रशिक्षणाद्वारे त्याचा उपयोग विद्यादानासाठी तसेच चरितार्थासाठी होऊ शकेल असा मंडळाचा उद्देश आहेअल्प शुल्क घेऊन संगीताचे शिक्षण देणे आणि संगीत विद्यालयांची स्थापना करणे या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या विचारसरणीला अनुसरून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहेगांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून देशातील 900 तसेच देशाबाहेरील 218 केंद्रांद्वारे परीक्षा घेतल्या जातातसांगीतिक प्रचारप्रसार करणाऱ्या गांधर्व महाविद्यालयाचा देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचार आणि प्रसार झाला असला तरी विद्यापीठ म्हणून मान्यता नसल्याने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीविद्यार्थिनींना पदवीपदविका तसेच पीएचडी तसेच नोकरीव्यवसायासाठी अडचणीचे ठरत होते.

संगीत क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाशी पदवीपदवीका तसेच पीएचडी शिक्षणासंदर्भात करार केला आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाशी करार करार केल्यामुळे बारावी आणि मध्यमा प्रथम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बीए प्रथम वर्षाला प्रवेश घेता येणार आहेअभ्यासक्रमाच्या परीक्षा जिल्हास्तरावरच घेतल्या जाणार आहेतऑक्टोबर महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading