Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विनायक मेटेंच्या चालकाबद्दल धक्कादायक माहिती समोर; विनायक मेटे यांच्या भाच्याने केले अनेक खुलासे 

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे याचे रविवारी रस्ता अपघाती निधन झाले. मात्र हा अपघात होता की घातपात याबाबद मेटे यांच्या कुटूंबियांकडून शंका उपस्थित केली जात आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. तर आज विनायक मेटे यांचा भाचा बाळासाहेब चव्हाण यांनीही या आपघाताबद्दल  शंका व्यक्त केली असून या प्रकरणी वेगळा खुलासा केला आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, या दुःखातून आम्ही सावरलो नाही, मात्र ३ दिवसानंतर आम्ही मीडिया समोर यायचे ठरवले. हा घातपात आहे का अपघात हे निष्पन्न झालेले नाही. ड्रायव्हर जो आहे तो वेगवेगळे स्टेटमेंट देतो आहे.

पुढे बोलताना बाळासाहेब चव्हाण म्हणाले, साहेबांचे ३ ड्रायव्हर आहेत. मला माहित नव्हतं कोण ड्रायव्हर आहेत ते, एकनाथ कदम हा ड्रायव्हर आहे असे कळले, तर मी त्याला मी फोन केला. मी त्याला त्यांचा लोकेशन विचारले. रोज फिरणारा ड्रायव्हर मला विचारात होता की तुम्ही कोण बोलतंय म्हणून मी त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो पण तो नुसता रडत होता. तिथे असणाऱ्या एका तिऱ्हाईत व्यक्तीला त्याने फोन दिला आणि त्यांनी मला सांगितले की तिथे अँब्युलन्स आली आहे. त्या व्यक्तीने मला सांगितले की ड्रायव्हरला काही झाले नाही पोलिस जखमी आहेत पण साहेब जागेवर गेले आहेत, असे सांगण्यात आले.

बाळासाहेब चव्हाण म्हणाले की, हा ड्रायव्हर रोज स्टेटमेंट बदलत आहे. सरकार ने समिती नेमली पण त्याचा पुढे काहीच झालं नाही. आम्ही या दुःखातून सावरलो नाही. सर्व चुकी ड्रायव्हर एकनाथ कदम यांची आहे. सी सी टिव्ही मध्ये आम्हाला कुठेच दिसली नाहीत. हा ड्रायव्हर सतत कोणाला फोन करत होता. ड्रायव्हरचा संपर्क कोणाशी होता त्याचे कॉल डिटेल्स हवेत, त्याने लोकेशन का नाही सांगितले त्याला नेमका काय प्रोब्लेम होता.असा सवाल देखील बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading