Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

‘यशस्वी’संस्थेच्यावतीने ‘समुह राष्ट्रगीत गायन’उपक्रम उत्साहात साजरा

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमातंर्गत पुण्यातील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे ‘समुह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम उत्साहात साजरा झाला. बुधवारी सकाळी ठीक अकरा वाजता संस्थेच्या प्रांगणात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्र प्रमुख प्राची राऊत यांच्यासह संस्थेच्या सर्व प्रशिक्षिका, विद्यार्थी व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading