आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे -नाना पटोले
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सारखे मीडियाशी बोलताना म्हणतात की मी राज्यासाठी वीस तास काम करत त्यावर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.मुख्यमंत्री २० तास कोणासाठी काम करत आहेत हे बघायला पाहिजे आम्ही रात्री १ वाजेपर्यंत काम करतो. काही लोकांना झोप लागत नसेल .आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो आहे. असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना लगावला.
फाळणी बद्दल चित्रफिती दाखवण्याचा निर्णय जो सरकार ने घेतला आहे . त्यावर काँग्रेस पक्ष हा आक्रमक झाला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले,
या विषयी हिंदू सभा आणि मुस्लीम लीग चे मोठे योगदान आहे. देशाचे विभाजन झाले नाही पाहिजे.
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभा यांनी देशाला आग लावली. त्यावेळी हे दोघे ही एकत्र होते या दोघांमध्ये फाळणी झाली. हे लोकांच्या समोर आले पाहिजे. असे नाना पटोले म्हणाले.
मुंबई ते गुजरात दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकार 50 टक्के तर गुजरात आणि महाराष्ट्र राज्य प्रत्येकी 25 टक्के खर्च करणार आहे. यापैकी राज्य सरकारचे 6 हजार कोटी वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे मोदींच्या गुजरातला याचा फायदा होणार .असे विरोधी पक्ष म्हणत आहेत. त्यावर नाना पटोले म्हणाले,आता त्यांनी देशाला लुटायचे आहे जसे महाराष्ट्राचे सरकार लोकांना लुटून गुजरात ला फायदा करून देते आहे. अशी टीका नाना पटोले यांनी मोदी यांच्यावर केली.
शिंदे व फडणवीस सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेन ला मंजुरी त्यावर पटोले म्हणाले,पहिल्या कॅबिनेट मध्ये त्यांनी बुलेट ट्रेन ला मंजूर दिली पण शेतकऱ्यांना एक ही मदत नाही. असे नाना पटोले म्हणाले.
राज्यात एकनाथ शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले मंत्रिमंडळ एक दीड महिन्यांनी झाला. पण अजूनही खातेवाटप झाले नाही .त्यावर एकनाथ शिंदे व फडणवीस हे सारखे लवकरात लवकर
खाते वाटप होईल .असे म्हणत आहेत .त्यावर नाना पटोले म्हणाले, हे सरकार असविंधनिक आहे. ही काँग्रेस ची भूमिका आहे.हि धोक्याची घंटा देशाच्या लोकशाही साठी आहे . justice delay देशासाठी धोक्याचे आहे. सुप्रीम कोर्टाने त्यावर तातडीने कारवाई करावी . अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
