दिल्ली मध्ये बसलेले मोदी, शहा आमदार विकत घेतात -नाना पटोले
पुणे : राज्यात आपला मुख्यमंत्री असावा असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते, परंतु केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरुन ते शांत होते. मात्र, हळूहळू या आवाजाचे रूपांतर मोठ्या नाराजीत झाले. वेळोवेळी जेडीयू-भाजप नेत्यांमधील मतभेद वाढत गेले आणि ते बिहार विधानसभेतही दिसून आले. या बिहारमधील नाराजीच्या वातावरणातच एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यातील भाजप नेते खडबडून जागे झाले. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखे घडवून आणण्याचा भाजपचा डाव होता परंतु नितीश कुमारांनी तो उधळून लावला. त्यावर नाना पटोले म्हणाले, दिल्ली मध्ये बसलेले मोदी, शहा आमदार विकत घेतात. अशी टीका काँग्रेसच्या प्रदेशाच्या नाना पटोले यांनी मोदींवर केली.
नाना पटोले म्हणाले,लालू यांच्या मुलाने मुख्यमंत्री विकत घेतला होता.कर्नाटक, मध्य प्रदेश मधील लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. जनतेचा निर्णय स्वीकारायचा असतो. अशी टीका काँग्रेसचे पैसे नाना पाटील यांनी भाजप वर केली.
काँग्रेसचे 15 आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशी चर्चा आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले,आमचे कोणी ही आमदार भाजप मध्ये जाणार नाहीत. असे नाना पटोले म्हणाले.
पाच सहा दिवसानंतर राज्याचे पावसाळीअधिवेशन होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष हे आक्रमक झाले आहेत. त्यावर काँग्रेस सुद्धा आक्रमक झाली आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले,अतिवृष्टी जिथे झाली तिथे मदत नाही मिळाली .शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिरंग्याचा मुद्दा याबद्दल आम्ही सरकारला प्रश्न पावसाळी अधिवेशनात विचारणार आहोत . असे नाना पटोले म्हणाले.
कॅबिनेट मध्येमहाराष्ट्रातील ८० टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे. अशी चर्चा झाली आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले, अशी एक बातमी मी दिल्लीत पाहिली. याबातमीचे सत्यत्ता काय आहे आम्ही अशी मागणी करणार आहे. असे नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना. महा विकास आघाडी मधील काही मंत्री हे वेगवेगळ्या प्रकरणात सापडले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप सातत्याने करत होती. पण आता या भाजप मधील मंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडकले आहेत. त्यावर नाना पटोले म्हणाले,भाजप कडे वॉशिंग मशीन आहे त्यातून लोकं शुद्ध होतात ही गोष्ट त्यांच्याच मंत्री दानवे यांनी सांगितली. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर नाना पटोले म्हणाले,बेशरम पणा ची हद्द आहे की असं भाषण करावं. हे वक्तव्य चुकीचे आहे.
