Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने तिरंगा रॅली

मुस्लिम मावळा फाउंडेशन चा अनोखा उपक्रम करून स्वातंत्र्यदिन साजरा –

पुणे : १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ७५ वा अमृत महोत्सवाचे औचात्य साधुन मुस्लिम मावळा फाउंडेशन व मुस्लिम समाज यांच्या वतीने पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये हाजी गफुर पठाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले .या रॅलीमध्ये ६० फुटी लांबीचा तिरंगा हातात घेऊन संपूर्ण कोंढवा परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.यावेळी समता , स्वतंत्र व बंधुतेची तसेच सामाजिक एकतेची शपथ सर्वांना देण्यात आली.

या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते .संपूर्ण परिसरातील मुस्लिम समाजाचे नागरिक ,महीला ,युवक व शालेय विद्यार्थी बहुसंख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण भारतात राबवले जात आहे. आम्ही देखील संपूर्ण कोंढव्यात स्वातंत्र्य दिन जल्लोशात साजरा करणार आहोत त्याची सुरुवात या रॅलीने करण्यात आली,असे यावेळी गफुर पठाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading