fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना संधी मिळेल -दीपक केसरकर

पुणे: राज्यातील नव्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटातून फक्त ९जणांनाच संधी मिळाल्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. त्यावर मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना संधी मिळेल अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

दीपक केसरकर आज पुणे दौऱ्यावर आहेत .तेव्हा त्यांनी पत्रकारांची विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारात बच्चू कडू आणि संजय शिरसाठ यांना स्थान न दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्याचबरोबर बच्चू कडू यांनी आपली नाराजी माध्यमासमोर बोलून दाखवली होती. त्यानंतर आम्ही त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करू.त्यांचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल. अस प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावर दीपक केसरकर म्हणाले,पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच जबरदस्त स्वागत झाले.कॅबिनेट सामूहिक जबाबदारी असते.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना त्या जिल्हाधिकारी याच्याशी बैठक करून सातारा,कोल्हापूर मध्ये पण जाणारा नंतर सिंधुदुर्ग मुख्यमंत्री जाणार आहेत. असे दीपक केसरकर म्हणाले.

संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आम्हाला संजय राठोड यांच्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत त्यावर दीपक केसरकर म्हणाले,
कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला होता .तो आरोप सिद्ध झाला नाही.एका समाजाचा मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळल.याची चौकशी अजुन सुरू आहे.चित्रा वाघ म्हणत असतील. तर चौकशी होईल चौकशी निःपक्षपाती पणे होईल.परंतु जर दोषी नसतील तर मंत्री का देऊ नये.त्याचा दोष आढळला तर कारवाई झाली असती.महिलांच्या बाबतीत आम्ही न्याय देण्यासाठी आहोत. असे दीपक केसरकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading