fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRA

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला खा. सुळे यांनी केली दुसऱ्या वर्षासाठीची घोषणा
मुंबई  – देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ च्या वतीने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’च्या दुसऱ्या वर्षासाठीची घोषणा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या फेलोशिपची घोषणा आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला आज करण्यात आली.

कृषी, साहित्य, आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी या फेलोशिपच्या माध्यमातून प्रेरीत केले जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. एम के सी एल चे चीफ मेंटॉर शिक्षण फेलोशिपचे मुख्य समन्वयक विवेक सावंत, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे सीईओ व कृषी फेलोशिपचे मुख्य समन्वयक निलेश नलावडे, साहित्य फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. नितीन रिंढे यावेळी उपस्थित होते. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती व सह्याद्री फार्म नाशिक यांचे तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एम के सी एल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत असून कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून भूमिका पार पाडत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील फेलोशीपसाठी उद्यापासून
http://www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राज्यभरातून ऑनलाईन अर्ज व प्रस्ताव सादर करता येतील. आलेल्या सर्व प्रस्तावांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १३ ऑक्टोबर २०२२ ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत तपासणी होऊन निवड प्रक्रिया पूर्ण होईल. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार इनस्पायर साहित्य फेलोशीप’ साठी १० तर शरद पवार इनस्पायर शिक्षण फेलोशिप साठी ४० अशा एकूण १३० फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तिन्ही फेलोशिपचे वार्षिक वेळापत्रक फेलोशिपच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे-

कृषी फेलोशिप:
१) १३ डिसेंबर २०२२ ते २३ डिसेंबर २०२२, अटल इंक्युबेशन सेंटर, बारामती
२) ४ एप्रिल २०२३ ते १० एप्रिल २०२३, सह्याद्री फार्म, नाशिक
३) १ ऑगस्ट २०२३ पासून पुढे ४५ दिवस – संबंधित संस्थांमध्ये इंटर्नशिप

साहित्य फेलोशिप:
१० डिसेंबर २०२२ – प्रथम वर्कशॉप
१८ व १९ फेब्रुवारी २०२३ – दुसरे वर्कशॉप
२३ व २८ मे २०२३ – तिसरे वर्कशॉप
१ व २ ऑक्टोबर २०२३ – चौथे वर्कशॉप
१० नोव्हेंबर २०२३ – फायनल सबमिशन

शिक्षण फेलोशिप:
२१, २२ व २३ एप्रिल २०२३ – प्रथम कार्यशाळा
१५ ते ३० ऑगस्ट २०२३ – प्रकल्पांना भेटी
१८, १९ व २० नोव्हेंबर २०२३ – द्वितीय कार्यशाळा
२६, २७ व २८ एप्रिल २०२४ – तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवाल सादरीकरण

निकाल जाहीर झाल्यानंतर दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी फेलोशिप मिळलेल्या फ़ेलोंना फेलोशिप प्रदान केल्या जाणार आहेत.
या उपक्रमाला पहिल्या वर्षासाठी भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले असून फेलोशीप मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

फेलोशिप कार्यक्रम वार्षिक वेळापत्रक:
११ ऑगस्ट – घोषणा , बुटकॅम्प व वर्कशॉपचे वेळापत्रक जाहीर करणे
१२ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२ – ऑनलाईन फॉर्म सबमिशन करता येणार
१३ ऑक्टोबर २०२२ ते ३ नोव्हेंबर २०२२ – फॉर्म तपासणी व निवड प्रक्रिया
११ नोव्हेंबर २०२२ – निकाल
११ डिसेंबर २०२२ – फेलोशिप प्रदान सोहळा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading