fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

हर घर तिरंगा अभियानामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे. पुणे व्यापारी महासंघातर्फे आवाहन

पुणे : आपल्या भारतीय स्वातंत्राच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारत सरकारने आयोजित केलेल्या “हर घर तिरंगा” या अभियानामध्ये आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात अनेकांनी आपले योगदान दिले आहे, हुतात्म्य पत्करले आहे. या सर्वांना अभिवादन करणे व त्यांना मानवंदना म्हणून नागरिकांनी आपआपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवायचा आहे.
दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत आपआपल्या घरी तिरंगा फडकवावा. दुकानांवर रोषणाई व सजावट करण्यात यावी. तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून देशाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावयाचे आहे.
तिरंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक आहे म्हणून राष्ट्रध्वजाचा मान व सन्मान आपण योग्य प्रकारे राखावा. प्लॅस्टिक ध्वज फडकविण्यास बंदी असून अभियानानंतरही आपण आपला राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक उतरवावा.असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांनी फतेचंद रांका यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading