Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

महिला बचतगट स्पर्धेत कीर्ती महिला बचत गट अव्वल

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत रास्ता पेठेतील कीर्ती महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. कोथरूड येथील मुक्ती महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि कर्वेनगर येथीस सह्याद्री महिला बचत गटाने तृतीय क्रमांंक पटकाविला. त्यांना रुपये ५१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

तर कोथरुड येथील मुक्ती महिला बचत गटाने द्वितीय व कसबा पेठेतील सह्याद्री महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उत्तेजनार्थ ७ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, संगीतकार सलील कुलकर्णी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, स्पर्धाप्रमुख सारिका निंबाळकर, परीक्षक जुई पटवर्धन आदी उपस्थित होते.

हर्ष श्रावणी- कोथरूड, अन्नपूर्णा-कसबा, कुलस्वामिनी-वडू, महालक्ष्मी- गुजरात कॉलनी, शिवगृहिणी- जुनी सांगवी, माहूरगड- कात्रज कोंढवा, स्वामिनी- येरवडा या बचतगटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, मिक्सर आदी पारितोषिके देण्यात आली. पहिला क्रमांक सुनिता पंडित, दुसरा क्रमांक प्रमिला जाधव, तिसरा क्रमांक मनिषा शिंदे, चौथा क्रमांक चारू चिकणे, पाचवा क्रमांक शारदा यादव हे यंदाचे विजेते ठरले. सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

निवेदिता सराफ म्हणाल्या, लहान मुलांना प्रेम करायला, आदर करायला, सन्मान करायला लहानपणापासूनच शिकवले जाते आणि त्यांच्यावर हे संस्कार आई करते. चांगला नागरिक घडविण्याची जबाबदारी आईवर असते त्यामुळे महिलांनी मुलींप्रमाणेच मुलांकडेही विशेष लक्ष देऊन त्यांना घडवायला हवे. आई ही मुलांची सर्वात पाहिली गुरु असते, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, सर्व महिलांनी स्वत:चा सन्मान आधी करा. कुटुंबावर माया करण्यासाठी आपला जन्म झाला आहे. पण आपलं मन आनंदी ठेवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अर्धा तास तरी स्वत:ला द्या, स्वत:ची आवड जोपासा. तरच आपण मुलांना घडवू शकते.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading