Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

अमेरिकेत होणाऱ्या बीएमएम अधिवेशनासाठी पुण्याचे शारंगधर साठे निमंत्रित

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे हे न्यू जर्सीच्या अटलांटिक सिटी मध्ये ११  ते १४ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळ २०२२ या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सच्या माध्यमातून भारतातून या अधिवेशनात सहभागी होणारे प्रा. शारंगधर साठे हे एकमेव सदस्य आहेत.
संगीत, नृत्य, रंगभूमी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि रिसर्च प्रोग्राम तसेच नृत्य दिग्दर्शन या विषयांवर प्रा. शारंगधर साठे बोलणार आहेत. भारती विद्यापीठाद्वारे आणि उत्तर अमेरिकेतील विद्यापीठांद्वारे दुहेरी मान्यता आणि विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा आदान-प्रदान कार्यक्रम या विषयावर देखील ते यावेळी संवाद साधणार आहेत.
बृहन महाराष्ट्र मंडळ २०२२ अधिवेशनामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होण्यासोबतच विविध शैक्षणिक पैलूंवर देखील विचारविनिमय करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंतर्गत अमेरिकेतील विद्यापीठे व भारतीय विद्यापीठे एकमेकांशी संलग्न होऊन शैक्षणिक क्षेत्रात काम करू शकतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक नवीन संधी दोन्ही देशातील विद्यापीठांना उपलब्ध होऊ शकतात तसेच दोन्ही देशातील विद्यापीठांना याचे अनेक दूरगामी फायदे भविष्यात होतील या विचारांतर्गत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading