झेंडा हातात म्हणजे स्वातंत्र्याच्या आसाची निष्ठा – रोहिणी गवाणकर
पुणे : स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता जेंव्हा झेंडा हातात घेऊन सहभागी झाला तेंव्हा ब्रिटिशांनी एवढा दबाव निर्माण केला की , काँग्रेसच्या कार्यकर्त्याने हातात झेंडा धरू नये. झेंडा जेंव्हा भारतीयाच्या हातात असे तेंव्हा त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या आसाची निष्ठा प्राणपणाने भरलेली असे म्हणून स्वातंत्र्य लढ्यात देशाचा झेंडा हातातून सोडून दिला जात नसे. कनकलता बरुआ ही अशी एक स्वातंत्र्य सेनानी जीन प्राणांची आहुती दिली पण झेंडा हातातून सोडला नाही. मादाम कामा ही त्यातील एक जिने पहिल्यांदा झेंडा फडकवला होता. केशरी रंग त्याग आणि धैर्याचा, पांढरा शांततेचा आणि हिरवा सर्वधर्म समभावाचा रंग हे स्थापित झाले. अश्या विविध आठवणी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी रोहिणी गवाणकर ह्यांनी सांगितल्या.
पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा मनीष आनंद यांनी आयोजित केलेल्या भारताच्या अग्निशिखा – भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचा सहभाग या व्याख्यान व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष बघणं हे खूपच आनंददायी आणि भाग्याच आहे.
ह्यावेळी आयोजित व्याख्यानात अलका जोशी आणि श्रद्धा रेखा राजेंद्र ह्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचा प्रेरणादायी सहभाग राणी चेन्नम्मा, कूईली, ललिता बक्षी, बेगम जिनत महल, बेगम हजरत महल, उदादेवी पासी आणि अश्या असंख्य ज्ञात-अज्ञात सर्व धर्मीय सर्व जातीय, आदिवासी भिल्ल वीरांगना महिलांची कहाणी सांगत रोमांचक इतिहास समोर आणला. जगातील सर्वात मोठं आंदोलन म्हणजे भारतीय स्वतंत्र लढा ज्यात गांधी नेहरू आणि काँग्रेस पक्ष्याच्या नेतृत्वाखाली सर्व जाती धर्माचे शिक्षित अशिक्षित, सर्व वयोगटाचे कामगार आदिवासी शेतकरी असे स्री पुरुष सामील झाले होते, अनेक शाहिद झाले. प्रत्येकाचे ध्येय मात्र एकच स्वातंत्र्य मिळवणे. आणि त्यातील महिलांचा अद्वितीय असा सहभाग विसरून चालणार नाही, असाच आहे.
यावेळी विचारपीठावर माजी महापौर कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचीटनीस अभय छाजेड आणि अलका जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राची दुधाने यांनी केली. स्वाती शिंदे ह्यांनी सूत्रसंचालन केले. आणि आभार प्रदर्शन अश्विनी गवारे ह्यानी केले
