‘हर घर तिरंगा’ हा भाजपाचा इव्हेंट – अतुल लोंढे
पुणे : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. प्रत्येकाच्या मनात राष्ट्रध्वज तिरंगा असून भाजपासाठी ‘हर घर तिरंगा’ म्हणजे एक इव्हेंट आहे. आमच्यासाठी तिरंगा हा अभिमानास्पद आणि भावनिक दिवस असल्याचं मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, संगीता तिवारी ,माजी आमदार मोहन जोशी, आमदार संग्राम थोपटे, नगरसेवक अभय छाजेड, माझी महापौर कमल व्यवहारे, पिंपरी चिंचवड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम उपस्थित होते.
अतुल लोंढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून. त्या निमित्ताने केंद्र सरकार अख्ख्या भारतात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवत आहे. प्रत्येकाला भारताच्या स्वातंत्र्याबद्दल प्रेम राहावं . ही आमची पण इच्छा आहे.
अतुल लोंढे म्हणाले,हर घर तिरंगा हा उपक्रम पुणे जिल्ह्यात 12 तारखेपासून राबवणार आहोत.
केतकावळा ,नसरापूर, पुण्याच्या ग्रामीण भागात, पिंपरी चिंचवड मध्ये 14 तारखेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या उपक्रमात आगाखान पॅलेस येथे सहभागी होणार आहेत.
15 ऑगस्ट ला या कार्यक्रमाची सांगता काँग्रेस भवन येथे होईल. .