fbpx

विश्वेश्वर बँकेत सेवक वेतन करार

पुणे  : सहकार क्षेत्रामध्ये अग्रेसर व बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यातील दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड व विश्वेश्वर बँक सेवक संघ, पुणे यांच्यामध्ये सेवक वेतन करार झाला आहे. कराराचा कालावधी १ जुलै २०२२ ते ३० जून २०२५ असा तीन वर्षांचा आहे. करारामुळे सेवकांना श्रेणीनुसार किमान रुपये ११०० ते कमाल रुपये १३००० इतकी मासिक वेतनवाढ मिळणार असून सवलतीच्या दराने कर्ज व रजा आदी सुविधा देखील मिळणार आहेत.

सदर करारावर बँकेच्या वतीने अनिल गाडवे (अध्यक्ष), सीए मनोज साखरे (उपाध्यक्ष) संचालक सुनील रुकारी, अमोल मणियार, राजेंद्र मिरजे, अतुल रुकारी, अॅड पुरुषोत्तम लांडगे, श्रीराम आपटे (मुख्य कार्यकारी अधिकारी) व राम दराडे (सरव्यवस्थापक) यांनी तर सेवक संघटनेच्या वतीने सोमनाथ वाडेकर (अध्यक्ष), बापूसाहेब गिरमे (सरचिटणीस), अमित सोळसे, ओमकार वीरकर व कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बँकेतील ३३६ कर्मचाऱ्यांना सदर कराराचा लाभ मिळणार आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: