fbpx

Rain Alert – राज्यात पुढील 5 दिवस पावसाची जोरदार हजेरी

पुणे: राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. 6ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत आहे. आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पुढील तीन दिवस राज्यातील विवध भागात पाऊस बसरणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.तर 7 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तर, 8 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: