होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे नवी मर्यादित श्रेणी लाँच
नवी दिल्ली : भारताच्या स्कूटर क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने मर्यादित काळासाठी नवी डियो स्पोर्ट्स उपलब्ध केली आहे. ग्राहकांना त्यांच्या जवळच्या रेड विंग वितरकाला भेट देऊन या गाडीचा अनुभव घेता येईल किंवा अधिक वर माहितीसाठी www.honda2wheelersindia.com/BookNow क्लिक करता येईल.
नव्याने तयार करण्यात आलेले आकर्षक कॅमाफ्लॉज ग्राफिक्स आणि स्पोर्टी रेड रियर सस्पेन्शनने स्टाइल करण्यात आलेली डिओ स्पोर्ट्स दोन नव्या रंगांत उपलब्ध करण्यात आली असून त्यात स्ट्रोन्टियम सिल्व्हर मेटॅलिक विथ ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड विथ ब्लॅक स्टँडर्ड व डिलक्स व्हेरियंटचा समावेश आहे.
याप्रसंगी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘सुरुवातीपासूनच डिओ श्रेणीने आपल्या आकर्षक व प्रसन्न रूपाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवी डिओ स्पोर्ट्स तारुण्य आणि स्टाइलचा तजेलदार रंगातला अनोफा मिलाफ साधणारी आहे. आम्हाला खात्री आहे, की ही मर्यादित श्रेणी ग्राहकांना विशेषतः तरुण पिढीला आपल्या स्पोर्टी आणि ट्रेंडी रूपाने आकर्षित करेल.’
युवकांसाठी स्टाइलमध्ये क्रांती घडवून आणणारी नवी डिओ स्पोर्ट्स आक्रमक आणि स्पोर्टी वाइब देणारी आहे. ही गाडी मोटो- स्कूटरचा नव्याने अनुभव देणारी असून याचं डिझाइन युनिसेक्स ग्राहकांना आवडेल असे आहे.
फायटिंग रेड रियर कुशन स्प्रिंगमुळे डिओ स्पोर्ट्सचा स्वॅग अजूनच उंचावला आहे. त्याशिवाय स्टँडर्ड आणि डिलक्स व्हेरियंट्समध्ये असलेल्या या वैशिष्ट्यांबरोबरच डिलक्स व्हेरियंटमध्ये स्पोर्टी अलॉयचाही समावेश करण्यात आला आहे.
चालकाच्या आरामदायीपणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या डिओ स्पोर्ट्समध्ये फ्रंट पॉकेटसारखी सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे निवांतपणे प्रवास करण्यासाठी अधिक चांगले स्टोअरेज मिळते.
मोटो- स्कूटरचा डीएनए आणखी पुढे नेण्यासाठी डिओमध्ये होंडाचे विश्वासार्ह ११० सीसी पीजीएम- एफआय इंजिन बसवण्यात आले आहे. स्मार्ट पॉवर (ईएसपी) आणि टेलिस्कोपिक सस्पेन्शन, इंटिग्रेटेड ड्युएल फंक्शन स्विच, एक्सटर्नल फ्युएल लिड, पासिंग स्विच आणि साइड स्टँड इंडिकेटर (इंजिन कट- ऑफसह) इत्यादी आधुनिक वैशिष्ट्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. इतर वैशिष्ट्यांमध्ये होंडाची विश्वासार्ह कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) विथ इक्विलायझर आणि ३-स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन, अधिक चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी ३ स्टेप इको इंडिकेटर यांचा समावेश आहे.
