Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

सीएनजीच्या दरात ६ रुपयांनी वाढ; नागरिक त्रस्त

पुणे: शहरातील सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सीएनजीच्या दरात बुधवारी रात्रीपासून ६ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ने घेतला आहे.
त्यामुळे पुणेकर वाहनचालकांना आता एक किलो सीएनजी साठी तब्बल ९१ रुपये मोजावे लागणार आहे. यापूर्वी सीएनजीच्या दरात एकावेळी १२ एप्रिल २०२२ रोजी ५ रुपये ८० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज तब्बल ६ रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीची मागणी वाढत आहे. स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. महाविकास आघाडी सरकारने सीएनजीवरील करात कपात केल्याने १ एप्रिल २०२२ रोजी सीएनजीचे दर कमी होऊन ते ६२.२० रुपये किलो झाले होते. त्यानंतर गेल्या ४ महिन्यात ७ वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यात तब्बल २८.८० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सततच्या दरवाढीने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading