fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

कतरिना कैफ इमामी ‘मंत्रा’ मसालेची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

मुंबई : इमामी अॅग्रोटेक लि. या वैविध्यपूर्ण व्यवसाय समूह इमामी ग्रुपच्या ब्रॅण्डेड फूड शाखेने त्यांची मसाले श्रेणी ‘इमामी हेल्दी अॅण्ड टेस्टी मंत्रा मसाला’साठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड अभिनेत्री व प्रसिद्ध सेलिब्रिटी कतरिना कैफ यांच्या निवडीची घोषणा केली.

आजच्या भारतीय पुरूष व महिलांशी संलग्न असलेल्या कतरिना यांचे वैविध्यपूर्ण व उत्साहवर्धक व्यक्तिमत्त्व ‘मंत्रा’ मसाल्यांचा चेहरा बनण्यास लक्षवेधक व योण्या निवड म्हणून दिसून आले. आपल्या व्यवसायाप्रती त्यांची कटिबद्धता आणि साकारणा-या प्रत्येक भूमिकेमध्ये त्या भर करणारा स्वाद ब्रॅण्डच्या ग्राहकांना कूकिंगसाठी सर्वोत्तम चव, स्वाद व सुवास देण्याच्या प्रबळ कटिबद्धतेशी परिपूर्णरित्या संलग्न होतात. मंत्राचा कतरिना कैफ यांच्यासोबतचा सहयोग भारतीय भौगोलिक क्षेत्रांमधील चवीसंदर्भात सतत बदलणा-या आवडी असलेल्या सर्व वयोगटातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मंत्रा मसालाची खासियत म्हणजे त्यामधील संपन्‍नता व शुद्ध सुवास, रंग व चव, जे अद्वितीय क्रियोजेनिक तंत्रज्ञानाच्या वापरामधून येते. शून्य ते ऋण ५०-अंश सेल्सिअस तापमानापर्यंत क्रियो-प्रक्रिया आमच्या मसाल्यांना जवळपास ७० अंश सेल्सिअस उष्णतेचा वापर करणा-या पारंपरिक ग्राइण्डिंग प्रक्रियेच्या तुलनेत जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत सर्व नैसर्गिक तेलांचा सर्वोच्च दर्जा राखण्यास मदत करते.

इमामी ग्रुपचे संचालक जयंत गोएंका म्हणाले, “आम्हाला भारतीय चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या व प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक क‍तरिना कैफ यांच्यासोबत सहयोग करण्याचा खूप आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, त्या मंत्रा मसालासाठी परिपूर्णरित्या जुळून जातात, जेथे त्यांची विश्वसनीयता, अथक मेहनत आणि कटिबद्धता आमच्या ब्रॅण्डच्या मूल्यांशी संलग्न होतात. आमचा दृढ विश्वास आहे की, त्यांची लोकप्रियता व व्यापक फॅन फॉलोइंगमुळे आम्हाला देशभरातील ग्राहकांशी उत्तमरित्या संलग्न होण्यास आणि मंत्राला मसाले ब्रॅण्डची पसंतीची निवड बनवण्यास मदत होईल..”

ब्रॅण्ड अॅम्बेसेडर कतरिना कैफ म्हणाल्या, “इमामी हा भारतातील घराघरांमधील अत्यंत लोकप्रिय व विश्वसनीय ब्रॅण्ड असण्यासोबत त्याचा दर्जा व कार्यक्षमतेसाठी ओळखला जातो. मला अशा दर्जाच्या ब्रॅण्डसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि विश्वास आहे की, मसाल्यांची इमामी हेल्दी अॅण्ड टेस्टी मंत्रा श्रेणी लवकरच भारतीय घराघरांमध्ये देखील पसंतीची निवड बनेल. मला विश्वास आहे की, ग्राहकांना आमची नवीन जाहिरात, तसेच इमामी हेल्दी अॅण्ड टेस्टी मंत्रा उत्पादनांची व्यापक श्रेणी आवडेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading