fbpx

इन्फिनिक्सने मोठी स्क्रिन व व्यापक स्टोरेजसह ‘स्मार्ट ६ प्लस’ लाँच केला

मुंबई : आपल्या मूल्य-केंद्रित स्मार्ट सिरीजमधील आणखी एक अव्वल कामगिरी करणारा डिवाईस सादर करत इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्‍या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्‍डने स्मार्ट ६ प्लस लाँच केला आहे. मोठी स्क्रिन, मोठी बॅटरी आणि सर्वात मोठे स्टोरेज अशा आवश्यक गोष्टींबाबत कोणतीच तडजोड न करता या डिवाईसमध्ये युजर्सना सर्वोत्तम व्युईंग अनुभव देण्यासाठी विभागातील अग्रणी ६.८२ इंच एचडी+ स्क्रिन आहे.

स्मार्ट ६ प्लस मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि इतर विविध कॅटेगरी-फर्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. हा डिवाईस ट्रान्किल सी ब्ल्यू, मिरॅकल ब्लॅक आणि क्रिस्टल व्‍हायोलेट या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येईल. हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवर ७९९९ रूपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे.

सर्वात मोठी स्क्रिन व डिस्प्ले: सर्वात मोठे व प्रखर मोबाइल व्युईंग अनुभवाच्या खात्रीसाठी नवीन स्मार्ट ६ प्लस मध्ये विशाल ६.८२ इंच ड्रॉप नॉच स्क्रिनसह एचडी रिझॉल्युशन, ४४० नीट्सचा ब्राइटनेस आणि ९०.६ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ आहे. या डिवाईसच्या सिनेमॅटिक स्क्रिनमध्ये १२००:१ कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि ७२ टक्के एनटीएससी कलर डिमोन्स्ट्रेशन आहे, ज्यामुळे फोटो व व्हिडिओ अधिक आकर्षक दिसतात.

सर्वोत्तम स्टोरेज क्षमता: नवीन स्मार्ट ६ प्लस हा इन-बिल्‍ट ३ जीबी एलपीडीडीआर४एक्स जीबी रॅमचे पाठबळ असलेले ६४ जीबी स्टोरेज आणि वाढवता येऊ शकेल अशी अतिरिक्त ३ जीबी व्‍हर्च्‍युअल रॅम असलेला स्मार्टफोन आहे.

स्मार्ट ६ प्लस मध्ये हेलिओ जी२५ प्रोसेसरची शक्ती असण्यासोबत आधुनिक गुगलचे अँड्रॉईड १२ (गो एडिशन) वैशिष्ट्य आहे, जे अॅप स्टार्ट-अप टाइम जवळपास १५ टक्क्यांनी सुधारते, युजर्सना ९०० एमबी अधिक स्टोरेज देते आणि डिवाईसच्या रॅमची जवळपास २७० एमबी मुक्त करते, ज्यामुळे ३ ते ४ अधिक अॅप्स डाऊनलोड करता येतात. मेमरी क्षमता जवळपास ५१२ जीबीपर्यंत वाढवण्यासाठी स्मार्ट ६ प्लस समर्पित ३-इन-१ एसडी कार्ड स्‍लॉटसह देखील येतो.

कॅमेरा कार्यक्षमता: स्मार्ट ६ प्लस मध्ये ८ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरासह फर्स्ट-इन-सेगमेंट ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. सेकंडरी कॅमेरामध्ये डेप्‍थ लेन्स आहे. फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिगसह रिअर कॅमेरामध्ये सर्व आवश्यक मोड्स आहेत.

विशाल क्षमतेची बॅटरी: या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी बॅकअप आहे. जे बॅटरी जीवन २५ टक्क्यांनी वाढवते.

Leave a Reply

%d bloggers like this: