Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचा भाजपचा डाव – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे विधान हे भारताच्या राजकारणाला घातक आहे. त्यांचे  विधान देशाला हुकूमशाहीकडे नेणारे असून लोकशाहीला मारक आहे. प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर केला.

भारतात कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. शिवसेनेला घरघर लागली आहे. तर कोंग्रेसचा गाशा अनेक राज्यातून गुंडाळला आहे. उर्वरीत पक्षही संपतील आणि केवळ भाजपा एकाच पक्ष शिल्लक राहील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल केला होता. या विधानाचा उद्धव ठाकरे यांच्या कडून पत्रकार परीषदेत घेवून समाचार घेण्यात आला.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला आता कोणताही विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाहीये. आताचे राजकारण आता घृणास्पद झाले आहे. हिंदूमध्ये फुट पाडण्याचे काम भाजप करीत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोशियारी यांनी मराठी माणसाची अस्मिता दडपण्याचा प्रयत्न केला होता. आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पोटातले ओठांवर आले आहे. जर तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे असतील तर जनतेमध्ये जावून दाखवा. जनताच तुम्हाला उत्तर देईन.

 

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading