Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी उभी आहे – उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची त्यांच्या घरी जावून भेटली. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्ष आणि मी स्वत: संजय राऊत यांच्या पाठिशी उभे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याभेटी वेळी ठाकरे त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आईच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासन ठाकरे यांनी राऊत कुटूंबीयांना सांगितले. अवघ्या दहा मिनिटांची ही भेट होती. भेटनंतर उद्धव ठाकरे यांना निरोप देण्यासाठी राऊत कुटुंब खिडकीत आले होते.

संजय राऊत यांचा मला अभिमान

“संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. संजय माझे जुने मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, जे पटत नाही त्याविरोधात ते  बोलतात. मरण आलं तरी शरण जाणार नाही, हे त्यांचं वाक्य अतिशय चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading