fbpx

धैर्यशील माने च्या विरोधात लोकसभा लढवणार आणि जिंकणारही -राजू शेट्टी

पुणे: मतदारांचा विश्वासघात करून शिंदे गटात गेलेल्या धैर्यशील माने यांना मतदार धडा शिकवतील. मी त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आणि जि़कणारही असा विश्वास स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांंनी व्यक्त केला
ऊस ऊत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नासंदर्भात शेट्टी यांनी शुक्रवारी दुपारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली.त्यानंतर पत्रकारा़बरोबर बोलताना राजू शेट्टी यांनी विविधमुद्द्यांवर भाष्य केले.

मी ना भाजपाचा ना महाविकास आघाडीचा, मी स्वतंत्र आहे असे सांगत  राजू शेट्टी म्हणाले,खरीप हंगामाच्या आधी क्रुषी मंत्र्यांंनी जबाबदारीने काम करायला हवे, पण आपले क्रुषीमंत्री हवापालट.करायला गुवाहाटीला गेले. आणि आता तर महिना झाला राज्याला क्रुषीमंत्रीच नाही.२३ जिल्ह्यातील ८ लाखहेक्टर क्षेत्रावरील.पिकाचे नुकसान झाले. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. दोनच मंत्र्यांचे सरकार काम करत आहे. बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला. रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. पण या समस्या सोडवण्याऐवजी राज्यात राजकारण सुरू आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.
कारखान्यांना आलेले च़ागले दिवस शेतकर्यांनाही यावेत अशी अपेक्षा व्यक्त करून शेट्टी म्हणाले, १५३६ कोटी रूपया़ची एफआरपी थकीत आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन हप्त्यात एफ आरपी द्यावा असा कायदा मंजूर करून घेतला. दोन.हप्त्यातही शेतकर्यांना। पैसे मिळाले नाहीत. आता ही थकबाकी व्याजासह शेतकर्यांना मिळावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

कारखाने शेतकर्यांचा छस वजनात मारतात. गाडीमागे २ टन वजन.कमी दाखवले जाते. या वर ऊपाय म्हणेन ऑइल कंपन्यांनी पेट्रोल पंपांसाठी जशी एकच संगणक प्रणाली विकसित केली आहे तशीच सर्व.कारखान्यांच्या वजनकाट्यासाठी करावी. त्याचा पासवर्ड साखर आयुक्ताकडे ठेवावा.अशी सुचना आयुक्ता़ना केली व त्यांनी ती मान्य केली असे शेट्टी म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: