fbpx

के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ऍब्रॉड यंदा ६० विद्यर्थ्यांना देण्यात आली 

मुंबई :  प्रतिष्ठित के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ऍब्रॉडअंतर्गत के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने ६० गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ३१५ लाख रुपयांचे वाटप केले आहे.  के. सी. महिंद्रा फेलो पुरस्कार अंजली गोयल, जिनांग शाह आणि भुवन्या विजय यांनी जिंकला असून त्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले तर ५७ शिष्यवृत्ती अर्जदारांना प्रत्येकी ५ लाख रुपये त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मदत म्हणून देण्यात आले आहेत.

यंदाच्या वर्षी या शिष्यवृत्तीसाठी तब्बल १९८२ अर्ज आले होते.  त्यातून ९८ जणांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. जाणकार, तज्ञ पॅनेलमार्फत घेण्यात आलेल्या या व्हर्च्युअल मुलाखती दोन दिवस सुरु होत्या.

निवड पॅनेलमध्ये देशातील ख्यातनाम, प्रतिष्ठित दिग्गजांचा समावेश होता – महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा; महिंद्रा इंटरट्रेड लिमिटेडचे अध्यक्ष श्री. भरत दोशी; कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेडचे अध्यक्ष, श्री. एम. एम. मुरुगप्पन; महिंद्रा समूहातील महिला सक्षमीकरण प्रमुख श्रीमती कौसल्या श्रीनिवासन; एटीएलएएस स्किलटेक युनिव्हर्सिटीच्या अध्यक्ष व चॅन्सेलर डॉ. इंदू शहानी; नियानामधील पार्टनर श्रीमती लीना लब्रू; नांदी फाउंडेशनचे सीईओ श्री. मनोज कुमार; सीईओ सल्लागार, ग्लोबल स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि चेंज मॅनेजमेंट एक्सपर्ट श्री. रंजन पंत; ब्रिस्टलकॉनचे अध्यक्ष श्री. उल्हास यरगोप; सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेस (सीएसईपी) चे अध्यक्ष श्री. विक्रम सिंग मेहता; आणि महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या सीईओ श्रीमती सुमन मिश्रा.

या शिष्यवृत्तीविषयी महिंद्रा उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “युवकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत. केसीएमईटी आणि महिंद्रामध्ये आम्ही व्यक्तींना महत्त्वाचे मानतो ज्यांना अजून जास्त करण्याची इच्छा असते. महामारी आणि आर्थिक अडीअडचणींमुळे परदेशात उच्च शिक्षण घेणे जिकिरीचे बनले असताना आम्ही गुणवान, क्षमतावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ शकत आहोत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.  निश्चित ध्येय आणि ते पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या प्रज्ञावंत युवकांना आम्ही भेटलो. आपण निवडलेल्या करिअरमधून भारतासाठी आणि जगासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांना आम्ही मदत करू शकत आहोत ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”

भारतात साक्षरता व उच्च शिक्षणाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा या उद्देशाने १९५३ साली के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टची (केसीएमईटी) स्थापना करण्यात आली. सुरुवातीपासून आजवर या ट्रस्टने ८,००,००० हुन जास्त क्षमतावान व पात्र विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे आणि त्याद्वारे फक्त भारताच्याच नव्हे तर जगाच्या भविष्याला आकार दिला आहे. के. सी. महिंद्रा स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज ऍब्रॉड ही या ट्रस्टने सुरु केलेली पहिली शिष्यवृत्ती आहे. आजवर १५९५ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचे लाभ मिळाले आहेत.  लक्षणीय बुद्धिमत्ता, उज्वल शैक्षणिक यश, उत्तम चारित्र्य आणि नेतृत्व गुण असलेल्या अतिशय होतकरू विद्यार्थ्यांना ही व्याज-मुक्त कर्ज शिष्यवृत्ती दिली जाते.

अंजली गोयल, जिनांग शाह आणि भुवन्या विजय अनुक्रमे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि लॉ चे उच्च शिक्षण घेणार आहेत. या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आलेले विद्यार्थी पुढील विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यास करणार आहेत – कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, रोबोटिक्स, एमबीए, आर्किटेक्चर, आर्टस् अँड डिझाईन, लॉ, पब्लिक पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन व इकॉनॉमिक्स. हे विद्यार्थी जगभरातील नामवंत विद्यापीठांमध्ये जाणार आहेत,

Leave a Reply

%d bloggers like this: