Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी अपमान केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन

पुणे:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान केला. स्मृती ईराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी माँगो स्मृती ईराणी माफी माँगो, भ्रष्टाचारीणी स्मृती इराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी निषेध व्य्क्त करताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, ‘‘बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती ईराणीने आमच्या नेत्या  सोनिया  गांधी यांच्याबद्दल माफी माँगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनियाजी गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती ईराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती ईराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू.’’

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद  म्हणाल्या, ‘‘संसदेमध्ये झालेला प्रकार हा निदंनीय आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वागणूक झाली तर आम्ही कदापीही सहन करणार नाही. सोनियाजी गांधी या नुकत्याच आजारातून बाहेर पडलेल्या असताना ज्या पध्दतीने स्मृती ईराणी संसदेत त्यांच्याशी वागल्या हे बघितल्यावर लक्षात येते की, गोव्याममधील अवैध दारू व्यावसायात झालेल्य बदनामीला लपविण्यासाठीच हे कृत्य स्मृती ईराणी यांनी केले.’’

यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्यपवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्हा्ळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, ॲड. रूकसाना पठाण, सुरेखा माने, रूकसाना शेख आदींसह असंख्य महिला कार्यकर्त्यां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading