fbpx

सामूहिक कलाविष्कार प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे :कोरेगाव पार्क, पुणे येथील मलाका स्पाईस कलादालनात रोमार्टिका द्वारा प्रस्तुत जुलै २०२२ ह्या महिन्यातील दुसरे सामूहिक कलाप्रदर्शन भरले आहे. हे प्रदर्शन  ३१ जुलै २०२२ पर्यंत सर्वांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बघता येईल. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष  सॅम्युअल केनेडी ह्यांच्या हस्ते झाले. ह्या प्रदर्शनात शंपा भूषण, शिबूजी नाथन, नरेंद्र गंगाखेडकर, सोनल मंत्री, मैत्री शहा, आशा सिंग गौर आणि प्रशांत शर्मा ह्यांची नवनिर्मित चित्रे ठेवली असून त्यातील वैविध्य, रंगसंगती आणि संकल्पना कौतुकास्पद आहेत. या सामूहिक कलाविष्कार प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

या सामूहिक कलाविष्कार प्रदर्शनात शंपा भूषण हिच्या चारकोलमधील चित्रामध्ये प्राणीजीवनातील प्रेमभावना आणि वात्सल्य दर्शविले आहे. शिबूजी नाथन  ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांमध्ये मानसिक तणाव, व्याधी व त्यातून मानवी आयुष्यात प्रकटणाऱ्या विविध भावनांचे कलात्मक दर्शन घडते. रंग, रेषा व विविध आकार ह्यांच्या कलात्मक समन्वयातून चित्रकाराने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत साकारलेला हा अनोखा आविष्कार त्यातील मूलभूत गुणांमुळे सर्वांना आवडतो. तर नरेंद्र गंगाखेडकर ह्यांच्या चित्रांमधून सृष्टीसौंदर्य व त्याची विविध ऋतूतील आकर्षक रूपे ह्यांचे रम्य दर्शन सर्वांना घडते. तसेच त्यांच्या व्यक्तिचित्रात दर्शविलेले मानवी भावनांचे विविध कंगोरे सर्वांना मोहित करतात.

सोनल मंत्री हिची चित्रे पूर्ण एक महिनाभर कलादालनात सर्वांना बघता येतील. अमूर्तता व पारंपरिकता ह्यांचा अद्भुत संगम साधून तिने निर्मिलेली ही चित्रे आकर्षक व मनमोहक आहेत. आपल्या वैशिष्ट्यामुळे ती सर्वांना आवडतात.
मैत्री शहा – हिच्या व्यक्तिमत्त्वातून मानवी मनातील विविध भावनांचे उत्कट व भावपूर्ण दर्शन सर्वांना घडते. त्यातील विविधता कौतुकास्पद आहे. आशा सिंग गौर – हिच्या निसर्गचित्रांमधून सर्वांना एक रम्य अनुभूती होते. विविध ऋतूतील निसर्गाची दिसणारी विलोभनीय रूपे आपल्या चित्रांमधून तिने साकारली असून त्यातील वैविध्यामुळे व कलात्मकतेमुळे ही चित्रे सर्वांना आवडतात. प्रशांत शर्मा – रचनात्मक संकल्पना व त्यास अनुरूप रंगसंगती ह्यांनी नटलेला प्रशांत शर्मा ह्यांचा कलाविष्कार मनमोहक व आकर्षक आहे. तो सर्वांना त्यातील मूलभूत संकल्पना व योग्य रंगसंगती ह्यामुळे आवडतो.

Leave a Reply

%d bloggers like this: