fbpx

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड भागातील नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप

पिंपरी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड, काळाखडक भागातील आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना स्मार्टकार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर सरचिटणीस रमजान सय्यद, युवा उद्योजक अविनाश वाकडकर, बाळासाहेब वाकडकर, गोविंद जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यमान भारत योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना आरोग्य विमा प्रदान करणारी योजना आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाखापर्यंत कॅशलेस विमा उपलब्ध होईल. याचा अर्थ असा की या योजनेत पात्र असणारी कोणतीही लाभार्थी व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेऊ शकते. त्यामुळे ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या उद्देशाने वाकड, काळाखडक भागातील नागरिकांना या योजनेंतर्गत स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. शासनाच्या अनेक लाभदायी योजना राबवून लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे, असे विशाल वाकडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: