ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनालिका आयटीएलतर्फे भरती योजनेची सुरुवात
पुणे : भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका आयटीएल ही भारतातील सर्वात तरुण ट्रॅक्टर उत्पादक कंपनी ठरत आहे. व्यावसायिक कंपन्यांच्या दृष्टीने अशक्य गोष्टी साध्य करण्यासाठी तरुणांमध्ये असलेल्या गतिमानतेवर सोनालिकाचा संपूर्ण विश्वास आहे. आपल्या मनुष्यबळामध्ये ताज्या प्रतिभांचा समावेश कारण्यासाठी सोनालिका आयटीएल तयारी करत असून ती राज्य पातळीच्या आयटीआय आणि इतर तत्सम संस्थांमधून ३,००० हून अधिक प्रतिभावान तरुणांची भरती करणार आहे. त्याद्वारे ग्रामीण आणि निमशहरी तरुणांना अखिल भारतीय पातळीवरील डीलर नेटवर्क टीममध्ये सामील होण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. भरतीच्या या मोहिमेमुळे तिच्या विद्यमान डीलर वर्कफोर्सला खेड्यापाड्यांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्यासाठी बळकटी मिळेल. इच्छुक आयटीआय शिक्षित तरुण कंपनीशी hiring@sonalika.com वर संपर्क साधू शकतात.
सोनालिका आयटीएल ही देशातील आघाडीच्या तीन ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक असून गेल्या ५ वर्षांपासून सातत्याने १ लाख ट्रॅक्टर विक्री करत आहे. तिने अलीकडेच आर्थिक वर्ष २३ मध्ये पहिल्या तिमाहीत ३९,२७४ ट्रॅक्टर्सची सर्वाधिक विक्री करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनी आज १३० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते आणि जागतिक पातळीवर १३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांशी संबंधित असल्याचा तिला अभिमान आहे. नवीन नियुक्तींमुळे सोनालिकाच्या अखिल भारतीय पातळीवरील मनुष्यबळाला बळकटी मिळेल कारण शेतीच्या यांत्रिकीकरणाच्या वाढीस चालना देऊन शेतकर्यांना बळ देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हा टॅलेंट हंट दर पाच वर्षांनी विक्री दुप्पट करण्याच्या कंपनीच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी कोणतीही इच्छुक व्यक्ती कंपनीच्या वेबसाइटवर थेट अर्ज करू शकते. आयटीआय आणि इतर तत्सम संस्थांमधील तरुण https://www.sonalika.com/hiring.html येथे अर्ज करू शकतात.
इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की आयटीआय तसेच इतर पॉलिटेक्निकसारख्या राज्यस्तरीय संस्थांमधून पदवी धारण करणाऱ्या प्रतिभावान तरुणांची भारतात मोठी संख्या आहे. त्यामुळे दर वर्षी नवीन प्रतिभा समोर येते. अशा व्यक्ती गतिमान असतात आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी भरलेल्या असतात. तसेच व्यवसायातील उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या तांत्रिक ज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी ते तत्पर असतात. आयटीएलमध्ये आमचा नेहमीच शेतकर्यांना कोणत्याही नवीन विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर विश्वास आहे. आमचे कर्मचारी संपूर्ण शेतकरी समुदायाला समृद्धी आणण्यासाठी वचनबद्ध आहेत..”
