fbpx

राज्यातल्या 4 महिला आमदारांची फसवणूक; अज्ञात व्यक्ती विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे: राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती.
मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र तो फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तक्रार दिली होती. त्या नुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकेश राठोड असे आरोपीचे नाव आहे. त्याने पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून ४३०० रुपये उकळले होते. google पे च्या माध्यमातून पैसे दिले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: