fbpx

.. तर एकनाथ शिंदे घेतील तो आम्हाला मान्य – उदय सामंत


पुणे :  शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे परत एकत्र येणार का यावर राज्यात चर्चा आहे त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर त्याबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. असे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणेकरांच्या वतीने 18 जुलैला सत्कार करण्यात येणार आहे. मुंबईत शिंदे यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता सत्कार करणार असं उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत म्हणाले,आम्ही 50 लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. मंत्री पद मिळो अथवा न मिळो आमच्यातील संबंध कायम चांगले राहणार आहे. मंत्रीपदासाठी मी शिंदेंसोबत गेलेलो नाही. माझ्या बाबतचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील. विरोधक आमच्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सामंत यांनी केला. एकनाथ शिंदे यांचं भाजपकडून खाच्चिकरण होतंय असं मला वाटतं नाही. माईक किंवा चिठ्ठी बाबत उपमुख्यमंत्र्यांनी त्याबाबत खुलासा केलाय असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत हे आता सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं उद्धव ठाकरेंना उद्देशून सावंत बोलले.
दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत पाच जागा आम्ही लढलो होतो. त्यामध्ये एक जागा शिवसेना लढली आणि इतर चार जागा आमचे घटकपक्ष लढले होते. घटक पक्षांच्या चारही जागा निवडून आल्या पण शिवसेनेची जागा पराभूत झाली. पराभूत झालेल्या जागेवर ज्या ठिकाणी अपक्ष आमदार निवडून आले होते. ते आठ दिवसानंतर काँग्रेसमध्ये गेले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत संजय पवारांना ४३चा कोटा दिल्यानंतरही त्यांचा पराभव झाला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले. त्यामुळे या मोहिम आणि उठावात आम्ही सामील होतो. हा शिवसेनेच्या शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उठाव होता. त्यामुळे मला शिवसेना ताब्यामध्ये घ्यायची आहे, असं कुठेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं नाहीये. तसेच आमच्यामध्ये चर्चा देखील झालेली नाही. हे गैरसमज पसरवण्याचं कोणीतरी केलेलं षडयंत्र आहे, असं उदय सामंत म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: