fbpx

‘भारताची जैविक मानचिन्हे ‘प्रदर्शनाचे उदघाटन

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त’ जीविधा’संस्थेतर्फे भारताच्या जैविक मानचिन्हांची माहितीपूर्ण पोस्टर असलेले प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.१७ जुलैपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन आहे आणि प्रवेश विनामूल्य आहे.’जीविधा’ संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया , डेहराडून यांनी वन्यजीवांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी व त्यातून त्यांच्या संवर्धनाच्या कामाला गती येईल यासाठी भारताचा राष्ट्रीय प्राणी, पक्षी असावा असे भारत सरकारला सुचवले होते. त्यातून भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी, वृक्ष,नदी निवडला गेलेच, सोबत वारसा प्राणी , राष्ट्रीय भाजी देखील निवडले गेले. मानचिन्हांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शनात मांडली आहेत तसेच पर्यावरण प्रेमी नागरिकांचा सहभाग असलेल्या स्पर्धांमधील फोटो,चित्रे देखील मांडण्यात आली आहेत.

स्पर्धांमधून जनजागृती :
मान चिन्हांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शनात मांडली आहेत. जास्तीत जास्त नागरीकांना यात सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी तीन स्पर्धा या प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केल्या होत्या . जंगल व वन्यजीवनाच्या फोटोग्राफी ची स्पर्धा ठेवली होती. मानचिन्हांची चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही चित्र वारली, गोंड,मुघल, कलमकारी आदी वेगळ्या चित्रशैलीत काढायची होती. शाळेतील विद्यार्थ्यांना मानचिन्हांच्या गोष्टी लिहायची स्पर्धा घेतली. या सर्व स्पर्धांना खूप उत्तम प्रतिसाद मिळाला.१४ जुलै रोजी सायंकाळी महाराष्ट्र टाइम्स च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले.

Leave a Reply

%d bloggers like this: