fbpx

औंध, बाणेर, बोपोडी परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत सुनील माने यांचे प्रशासनाला निवेदन

पुणे  : औंध – बाणेर परिसरातील मुख्य रस्त्यावरील खड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी आज पुणे महानगरपालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही.जी कुलकर्णी यांच्याकडे केली.
सुनील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औंध, औंध रस्ता, बाणेर, बोपोडी,चिखलवाडी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतूक संथ गतीने होत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्स्यातील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.आपल्या अवलोकनार्थ यातील काही भागांची नावे आपल्याला पाठवत आहे. स्पायसर ते औंध रस्ता या मार्गावर स्पायसर शाळा, महाराष्ट्र हॉटेल, आयुका गेट, आंबेडकर चौक, ममता स्टोअर समोर येथे खड्डे पडले आहेत.

बोपोडी भाऊ पाटील रस्ता ते आंबेडकर चौक मार्गावर हॉटेल सिद्धीविनायक समोर, डीएचएल कंपनी समोर, जनता हॉटेल समोर खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे औंध रस्ता खडकी स्टेशन रस्त्यावर शेवाळे हॉस्पिटल समोर, रिलायन्स मार्ट समोर, खडकी स्टेशन येथील साई रिक्षास्टँड समोरील पूर्ण पट्टा, रेंजहिल्स कॉर्नर , बोपोडी आदर्शनगर, संजयनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
बाणेर फाटा ते बाणेर या मार्गावर खड्डे आहेत. सकाळ नगर ते हॉटेल भैरवी, बँक ऑफ महाराष्ट्र नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी विद्यापीठ ते बाणेर पर्यंत, बाणेर फाटा ते सोमेश्वरवाडी चौक, औंध जकात नाका ते बाणेर स्मशानभूमी रोड येथे खड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
याबरोबरच खडकी स्टेशन जवळील कुंदन हेरीटेज सोसायटी समोर असलेल्या मुख्य रस्त्याला तसेच मानाजीबाग येथील किर्लोस्कर कंपनी रस्त्यावर असलेल्या रेल्वेरूळा जवळ पावसामुळे रस्ता खराब होऊन रल्वेरूळ वरती आले आहेत. या दोन्ही रस्त्याला वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तेथून प्रवास करताना दुचाकी घसरून दुचाकीस्वार जखमी होतात. या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात होऊन काही लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत योग्य ती उपाय योजना करावीआपण या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीबाबत योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: