fbpx

भारतातील रिअल इस्टेटसाठी K2V2 टेक्नॉलॉजीज तर्फे ‘बियॉन्ड वॉल्स’ ही एकीकृत प्रॉप टेक परिसंस्था सादर

मुंबई : भारताची वन-स्टॉप विश्वसनीय आणि पारदर्शक प्रॉप टेक परिसंस्था बनण्याचे उद्दिष्ट असलेला बियॉन्ड वॉल्स हा तंत्रज्ञान-प्रणीत प्लॅटफॉर्म  आज सादर करण्यात आला. घर खरेदीदारांसाठी एक अखंड एंड-टू-एंड सोयीसुविधा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून विकसक आणि चॅनल भागीदार यांच्यातला सहयोग सक्षम करण्याचे काम बियॉन्ड वॉल्स करते.

सार्वजनिकरित्या सूचीबद्ध टेक फर्म ऑरम प्रॉप टेक (पूर्वी मॅजेसको म्हणून ओळखले जाणारे) समार्थित आणि K2V2 टेक्नॉलॉजीजच्या ३०० सदस्यांच्या टीमतर्फे बियॉन्ड वॉल्स संपूर्ण रिअल-इस्टेट मूल्य साखळी साठी विकसित आणि उन्नत अनुभव निर्माण करण्यासाठी भारताचे उत्तर बनण्यासाठी सज्ज आहे.

बियॉन्ड वॉल्स विकासकांना त्यांच्या विक्री संघाचे आउटसोर्सिंग करून किंवा वाढवून आणि घर खरेदीदारांच्या योग्य संचाला लक्ष्य करून प्रकल्प सादर करताना विक्रीचा वेग वाढविण्यात मदत करते. घर खरेदीदारांच्या सातत्यपूर्ण प्रतिबद्धतेची खात्री करण्यासाठी उत्पादन डिझाइनला प्रभावीपणे आकार देऊ शकणाऱ्या मार्केट इंटेलिजन्स पासून फर्म संपूर्ण मूल्य साखळीमध्ये क्युरेटेड सेवा देखील सादर करते. बियॉन्ड वॉल्सकडे चॅनल पार्टनर्स (CPs) साठी एक तंत्रज्ञान-सक्षम एकत्रीकरण प्लॅटफॉर्म आहे. त्यातून त्यांच्या असंघटित व्यवसायांचे डिजिटल रूपांतर करण्यात मदत होते आणि त्यांना प्रकल्प माहिती आणि मार्केट इनसाइट्समध्ये रिअल-टाइम ऍक्सेस प्रदान करते. बियॉन्ड वॉल्स खास बांधकाम व्यवसायासाठी डिझाइन केलेली  पुरस्कार-विजेती एकात्मिक तंत्रज्ञान सुविधा Sell.Do CRM सोबतही जोडली गेलेली आहे.

ही फर्म गेल्या ६ महिन्यांपासून पुणे मार्केटमध्ये कार्यरत आहे. या कालावधीत, त्यांनी पुण्यातील २० प्रकल्प आणि २ टाउनशिपमध्ये १५०० हून अधिक युनिटच्या इन्व्हेंटरीची यशस्वीरित्या विक्री केली आहे आणि ३००० हून अधिक चॅनल भागीदारांना ऑनबोर्ड केले आहे. पुण्यातील यशानंतर, बियॉन्ड वॉल्सची महत्वाकांक्षी योजना मुंबई आणि बंगळुरू सारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये विस्तारण्याची आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ५००० हून अधिक युनिट्सच्या इन्व्हेंटरीची विक्री करण्याची आहे. टीम त्यांच्या प्लॅटफॉर्मवर १५००० हून अधिक सीपीज ऑनबोर्ड करण्याची देखील योजना आखत आहे.

“भारतातील बांधकाम व्यवसाय अब्जावधी-डॉलरचा मालमत्ता वर्ग हळूहळू तंत्रज्ञान प्रणीत  परिवर्तनासाठी खुला होत आहे. सध्याच्या असंघटित बाजारपेठेत वितरण नेटवर्क वाढवण्याची गुरुकिल्ली प्रॉप टेक असेल. आम्ही गृहखरेदीदार, विकसक आणि चॅनल पार्टनर्स यांच्यामधील अंतर भरून काढण्यासाठी बियॉन्ड वॉल्सची संकल्पना मांडली आहे. आमच्या वैशिष्ट्यपूर्ण टेक प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला बाजारपेठेमधील स्पर्धकांपेक्षा जास्त वेगाने वितरण वाढविणे शक्य होईल,”  असे बियॉन्ड वॉल्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम कोटणीस म्हणाले.

ऑरम व्हेंचर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष देवरा म्हणाले, “रिअल इस्टेट डेव्हलपर्स आता त्यांच्या प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी तंत्रज्ञान सुविधा आणि सेवांकडे वळत आहेत आणि वर्धित ग्राहक अनुभव निर्माण करण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत. K2V2 टेक्नॉलॉजीजचा रिअल इस्टेट CRM, विक्री स्वयंचलन आणि विपणन यामध्ये मोठा बाजारपेठीय वाटा आहे. आम्हाला विश्वास आहे की बियॉन्ड वॉल्स K2V2 टेक्नॉलॉजीजच्या वाढीच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा टप्पा जोडेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: