fbpx

मोदीसरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

पुणे: राज्यात नवीन सरकार आले तरी मोदी सरकारने महागाई कमी केली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी ने मोदी सरकारच्या विरोधात व महागाई विरोधात आंदोलन केले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोदीसरकारने वाढवलेल्या वीज दर, पेट्रोल डिझेल दरवाढ, विरोधात आंदोलन केले. हे आंदोलन पुण्यात झाशीची राणी पुतळा बालगंधर्व चौक येथे करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप नेतृत्वात यांच्या करण्यात आले.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादीकाँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष मृणाल वाणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष सीमा सातपुते, राष्ट्रवादीचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक, व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, या आंदोलनासाठी या सर्व महागाईचे नायक नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते परंतु त्यांनी स्वतः न येता आपले प्रतिनिधिक स्वरूपात आपल्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांना आंदोलनासाठी पाठवले. यावेळी बोलताना गरीबी,महागाई व बेरोजगारी यांनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षात मोदीजींनी आम्हाला एकही दिवस सुट्टी दिली नाही.आमचा उपयोग करत मोदीजी देशातील जनतेला लुटत असून आम्हाला जनतेची किव येते परंतु मोदीजींना येत नाही.कृपया जनतेनेच मोदींना धडा शिकवत आमची या त्रासातून मुक्तता करावी. असे प्रशांत जगताप म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: