fbpx

भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे – उद्धव ठाकरे

मुंबई :आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. परंतु तुमची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असा पुनरुच्चार माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुखउद्धव ठाकरे यांनी केला आहे

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर यांच्यासह  पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव ठाकरे यांनी आज घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात अरुणाचल प्रदेशसारखा निकाल लागण्याची शक्यता आहे. आपण बंडखोर आमदारांविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. असे आवाहन शिवसैनिकांना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा.असे आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. तर राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरू आहे, असा घणाघात त्यांनी भाजपावर केला.
की मला तुम्हाला देण्यासारखे काही नाही.मात्र तुम्ही मला साथ द्या, पुन्हा उभे राहू.अशी भावनिक साद त्यांनी घातली.

Leave a Reply

%d bloggers like this: